युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली
विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. Cancel Final Year Exams असे या ऑनलाईन याचिकेचे नाव आहे. या याचिकेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
युवासेनेने Change.org या वेबसाईटवर ही ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेला आतापर्यंत १ लाख ६५ हजार ३७४ जणांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली आहे.
www.konkantoday.com