मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका नायजेरियन नागरिकाला दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह अटक
दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका नायजेरियन नागरिकाला दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थासह मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ताब्यात घेतले. ७ जुलै रोजी निळजे ते तळोजा दरम्यान गाडीची अलार्म चेन पुलिंग करून तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के.एन. शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी शिवाजी पवार यांनी त्याला पकडले.
त्याने आपले नाव सनी ओचा आयके असल्याचे सांगितले. तो नायजेरिया येथील नागरिक आहे
www.konkantoday.com