ब्रेक द चेन सर्वांसाठी आवश्यक, त्याचे स्वागत!-डॉ. दिलीप पाखरे
अतिघातक, विघातक कोविड-१९ सारख्या कोरोनाशी समूह संसर्ग साखळी तोडायची असेल तर त्याचं एक बॉयोलॉजिकल विज्ञान आहे, या कोरोना-१९ चा संक्रमण कालावधी १४ दिवसांचा आहे, असे संशोधन निष्कर्ष आहेत.
असे मत डॉ. दिलीप पाखरे यांनी
व्यक्त केले आहे.कुठल्याही शासन, प्रशासन, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष, कारखानदार, व्यापारदार, शेतकरी आणि सामान्य जनांना लॉकडाऊन नको असतो, त्यात निश्चित असे समाजशास्त्र आणि ज्यावर जग जगतं हे अर्थशास्त्र आहे.
पण या जागतिक महामारीच्या कोविड-१९ च्या विषाणूचा बॉयोलॉजिकल ब्रेक करण्यासाठी अलगीकरण, विलगीकरण आवश्यकच आहे. म्हणून अत्यंत कठोर, शिस्तबद्ध, संयमबद्ध आणि साथ अंतरीचे नियबद्ध लॉकडाऊन स्विकारलेच पाहिजे, ही काळाची आणि संसर्ग रोखण्यासाठीचे जालीम उपाययोजना उपयुक्त आहे.
आपण हे सर्व समजून घेवून वागूया आणि कोविड-१९ ची हकालपट्टी करण्यातील महत्वाचे योद्धा ठरूया…!
www.konkantoday.com