बनावट फेसबुकद्वारे महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला बारामती पोलिसांनी केली अटक-पुणे, नगर, संगमनेर, रत्नागिरी आदी ठिकाणीही त्याने गुन्हेकेल्याचा संशय

बनावट फेसबुकद्वारे महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश खरात या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलांशी मैत्री करुन त्यांचे अश्लील फोटो बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या हजारे नावाच्या ठकास बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. २९ वर्षीय या युवकाने अनेक महिलांना अशाच पद्धतीने ब्लॅकमेल केल्याचं समोर आले आहे. बारामती तालुका पोलिसांनी या महाठकाला सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथून अटक केली. इतकंच नाही तर पुणे शहर, घारगाव, कराड, संगमनेर आणि रत्नागिरी या ठिकाणीही याप्रकणी गुन्हे दाखल असल्याची बाब पूढे येत आहे. या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button