
नारायण राणेंना आता आरोप करण्यापलीकडे काही जमत नाही -खासदार विनायक राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पडवे येथील खासदार नारायण राणे यांच्या हॉस्पिटलला येथील जनतेच्या हितासाठी दोन महिन्यांपूर्वीच ग्रीन सिग्नल दिला होता हे राणेंनी विसरू नये. राणेंना आता आरोप करण्यापलीकडे काही जमत नाही. भाजपने त्यांना निमंत्रित सदस्य करून कायमचे गप्प केले आहे. आता ते राजकीय संन्यासात गेलेत. त्यांनी कार्यतत्पर जनतेचे हित जोपासणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा इशारा लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिला.
www.konkantoday.com