
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृहावर’ हल्ला करणार्या आरोपींना तात्काळ अटक करा – खेड तालुका रिपाइं मागणी
प्रतिनिधी/खेड: काल सायंकाळी मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृहावर हल्ला झाला. हा हल्ला करणार्या समाजकंटकांना महाराष्ट्र पोलिसांनी त्वरित अटक करावी, अशी मागणी खेड तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी अध्यक्ष विकास धुत्रे यांनी केली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील सिसिटीव्हीचेही मोठे नुकसान केलंय. राज्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना अशा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, म्हणून आंबेडकर कुटुंबियांनी शांततेचे आवाहन केले आहे, त्यामुळे आम्ही सनदशीर शांततामय मार्गाने न्यायाची मागणी करीत आहोत, त्यामुळे आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी करीत आहोत, असे युवक अध्यक्ष विकास धुत्रे म्हणाले.