लॉकडाऊन पुढे सुरु राहणार
५ हजार खालील लोकसंख्या असलेल्या गावात दुकाने सुरु ठेवण्याची सवलत
:ब्रेक द चेन अंतर्गत रत्नागिरी जिल्हयात लागू लॉकडाऊन १५ जुलै २०२० पर्यंत जारी ठेवण्याचे आदेश अंशत: शिथिलता देऊन कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले.
यानुसार परिशिष्ठ ब मध्ये ५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावातील सर्व दुकाने सुरु ठेवता येईल, अशी सवलत देण्यात आली आहे. तथापि या दुकानात ६० वर्षांपुढील व्यक्ती तसेच १० वर्षांखालील मुले यांना सामान खरेदी करता येणार नाही. एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला खरेदीची मुभा असेल.
या खेरीज यापूर्वी जारी केलेल्या आदेशातील सर्व निर्बंध १५जुलै २०२० च्या मध्यरात्री १२ पर्यंत कायम ठेवण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com