रत्नागिरी जिल्ह्यात 32 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 813,बरे झालेले 522
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून 32 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 813 झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 522 झाली असून आज कोव्हीड केअर सेंटर देवधे, लांजा येथून 01, जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 2 आणि कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही दापोली येथून 04, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 05, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 अशा 15 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 08
लांजा-04
राजापूर-05
मंडणगड-04
दापोली-05
कळंबणी-05
संगमेश्वर-01
सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 263 आहे. भाट्ये रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन गीता भुवन, मौजे नरशिंगे, मौजे साईनगर कुवारबाव व गद्रे कंपनी, सन्मित्र नगर हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे
*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 813
बरे झालेले – 522
मृत्यू – 28
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 263
पैकी 08 रुग्ण होम आयसोलेशन,
3 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले,
www.konkantoday.com