रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये १,७२,८१३/- रु ची अवैध दारू जप्त

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टाळेबंदीच्या (लॉकडाऊन)  कालावधीमध्ये अवैध दारु धंदयांचा शोध घेवून, छापे टाकून १४ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले असुन १,७२,८१३/- रु ची अवैध गावठी हातभट्टीची दारु व विदेशी बनावटीची दारु आरोपीताकडुन हस्तगत करण्यात आलेली आहे.सदर गुन्हयांत २३ आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आलेली आहे.रत्नागिरी जिल्हा घटकामध्ये अवैध धंदयांचा समुळ उच्चाटन करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button