
रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या पुढाकारातून नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमा कवच
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे कर्मचारी देखील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.अशा नगर परिषद कर्मचारी व अधिकाऱ्यांना जे कोरोनाच्या विरोधात आपले कर्तव्य पार पाडत आहे अशा ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगर परिषदेने प्रत्येकी २५ लाखांचे विमा कवच दिले आहे.हे विमा कवच कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पालिकेतर्फे देण्यात येणार आहे.त्यासाठी नगर परिषदेने एलआयसीचा इन्शुरन्स उतरवला असून त्याच्या हप्त्यापोटी तीन लाख रुपये खर्च नगर परिषदेला आला आहे.तरी देखील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जो पुढाकार घेतला आहे त्यामुळे कर्मचाऱयांच्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com