यूजीसीच्या निर्णयाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमधून सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रियां
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला. त्या निर्णयाबद्दल देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. ‘मीम्स’ना उधाण आले आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा कोणत्याही पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, असे निर्देश ‘यूजीसी’ने सोमवारी दिले. त्यावरून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवरही अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘कॅन्सल फायनल इयर एक्झाम्स’ या ट्विटर हॅण्डलवर विद्यार्थी प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
www.konkantoday.com