परवानगी नसलेल्या दिवशी मटण चिकन दुकाने उघडली , चिपळुणात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात काराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून मटण व चिकनचे दुकाने तीन दिवसच दुकाने उघडण्यास परवानगी दिली असताना बंदी असलेल्या दिवशी देखील दुकाने उघडल्या बद्दल चिपळूण येथील भेंडीनाका येथील जालिल माहिमकर रा. खाटीकआळी व वसीम खाटीक राहणार पेठमाप यांच्याविरोधात चिपळूण नगरपालिकेच्या लिपिकाने पोलीस स्थानकात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी महाराष्ट्र काे व्हिड उपाययोजनांच्या कलमाखाली आदेशाचा भंग केला म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com