जिल्ह्यात सरासरी ४१.७७ मिमी पावसाची नोंद
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४१.७७ मिमी तर एकूण ३७५.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड ०.५, दापोली ७.७० मिमी, खेड ३३.३० मिमी, गुहागर २०.८०मिमी, चिपळूण २५.३० मिमी, संगमेश्वर ७६.४० मिमी, रत्नागिरी ८३.००मिमी, राजापूर ५३.३० मिमी, लांजा ७४.८० पावसाची नोंद झाली आहे.
तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १०वाजता प्राप्त झालेल्या नैसर्गिक आपत्ती नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार राजापूर तालुक्यातील मौजे शिवणे बु.येथील प्रभाकर पांडूरंग भोसले (पोलीस पाटील) यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले असून जिवीत हानी नाही असे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे
www.konkantoday.com