
कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या बैठक घेतलेल्या संघटनेचा बाहेरुन आलेला पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सद्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या एका वरिष्ठ नेत्याने बैठक घेतली होती. या बैठकीला कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि संघटनेची काही लोक उपस्थित होते. बैठक घेतलेल्या संघटनेचा बाहेरुन आलेला पदाधिकारी त्याच्या राज्यात गेल्यावर आता नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तसेच या पदाधिकाऱ्यांने दुसऱ्या राज्यातून रत्नागिरीत येताना कोकण रेल्वेतून प्रवास केला होता. बैठकीनंतर पुन्हा दुसऱ्या राज्यात प्रवास केला. त्यामुळे कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर चिंतेत अधिक भर पडली आहे
www.konkantoday.com