एसटीचे उत्पन्न आणि प्रवासी नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना संधी देण्याची मागणी
सर्वसामान्य जनतेचे लालपरी एसटी सुद्धा खासगीकरणाच्या वाट्यावर असल्याचे दिसून येत आहे. लाॅकडाऊन काळात एसटीचे निव्वळ प्रवासी उत्पन्न बुडल्याने, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे ही कठीण झाले असतांना, याचा फायदा घेत राज्यातील खासगी बस वाहतूकदारांनी एसटीचे उत्पन्न आणि प्रवासी नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना संधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे.राज्यातील खासगी वाहतूकदारांनी राज्य शासनाकडे एसटीच्या मार्गांवर खासगी बस चालवण्याची मागणी केली आहे. महामंडळाचे उत्पन्न आणि प्रवासी मिळत नसलेल्या मार्गांवर खासगी बस वाहतूकदारांना दिल्यास, त्यामधून उत्पन्न काढता मिळणार आहे. तर त्याचा फायदा एसटी महामंडळा सुद्धा कसा करून देता येईल यासंदर्भातील उपाय खासगी बस वाहतूकदारांनी राज्य शासनाला निवेदनातून दिले आहे.
कर्नाटक वरून महाराष्ट्रात ५०० बसेस येतात. मात्र महाराष्ट्राच्या २० बसेस ही कर्नाटकात जात नाही. छत्तीसगड मधील रायपूर ते नागपूर, मध्यप्रदेश मधील इंदोर वरून महाराष्ट्रात गाड्या येतात मात्र, एसटी महामंडळ इंदोरसाठी आपल्या गाड्या सोडत नाही. अशा वेळी खासगी बस वाहतूकदारांना ही संधी द्यावी अशी त्याची मागणी आहे
www.konkantoday.com