एक शरद…सगळे गारद’!
विधानसभा २०१९ नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. येत्या शनिवार पासून 3 भागांत ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.
संजय राऊत यांनी ट्विटर वरून या मुलाखतीचा टिझर समोर आणला असून या मुलाखतीला ‘एक शरद…सगळे गारद’!अस नावं दिल आहे. त्यामुळे या मुलाखातीकडे संपूर्ण देशातील राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com