
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत साशंकता,कॉंक्रीटच्या महामार्गाला ठिकठिकाणी तडे
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील घाटात सुरूवातीलाच काही अंतरावर दोन दिवसांपासून कॉंक्रीटच्या महामार्गाला सुमारे १५० फूट अंतरापर्यंत तडे गेले आहेत. तसेच गटाराच्या स्लॅबचे काम कमकुवत असल्याने कॉंक्रीट रस्त्याला तडे जावून कालांतराने स्लॅबमधील खडी बाहेर पडून खड्डा तयार होणे, पुलाच्या भरावाच्या संरक्षक भिंतीना लावलेले कॉंक्रीटच्या स्क्वेअरच्या आतील बाजूला मातीच्या भरावामध्ये पाणी साठून पुढे येणे, असे प्रकार दिसून येत आहेत.त्यामुळे हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच त्यांच्या कामाबाबत शंका निर्माण होत आहे www.konkantoday.com