
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या महाविद्यालयांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार १०० संगणक देणार
कोकणातील निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना बसला. सुमारे १६ महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या महाविद्यालयांना १०० संगणक देणारआहेत महाविद्यालयांमधील संगणक, खुर्च्या, टेबल, पंखे आदी अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे विद्यापीठाने शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
विद्यापीठाकडून मदतीची प्रतीक्षा असताना असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज (मुंबई) या संघटनेने वादळग्रस्त महाविद्यालये पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार संघटनेने महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे संघटनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही मदतीसाठी विनंती केली होती.
या विनंतीनुसार पवार या वादळग्रस्त महाविद्यालयांना १०० संगणक देणार आहेत. इतर संस्थाचालकांनी पंखे, खुर्च्या, ग्रंथालयांसाठी कपाटे, ट्यूबलाईट, प्रिंटर, फळे आदी साहित्य संघटनेला दिले आहे. हे साहित्य लवकरच संबंधित महाविद्यालयांना पोहोचवण्यात येणार आहे
www.konkantoday.com