
केंद्राने महाराष्ट्राला अधिक लस पुरवण्याबाबत आज विधानसभेत ठराव होणार
महाराष्ट्राचा लस देण्याचा विक्रम लक्षात घेता आम्ही दररोज लक्षावधी नागरिकांचे लसीकरण करू शकतो. कोविडचा सामना करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. केंद्राने लस पुरवण्याचे मनावर घेतल्यास महाराष्ट्र नागरिकांना आधार देईल, असा ठराव उद्या आरोग्यमंत्री राजेश टोपे मांडणार आहेत. केंद्र सरकारवर या ठरावामुळे जबाबदारी टाकल्यासारखे होईल, असे आघाडीतील नेत्यांना वाटते.
www.konkantoday.com