राज्यात काल कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात काल कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८६ हजार ४० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज ३६५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ११ हजार ७४० झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८ टक्के एवढे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख १२ हजार ४४२ नमुन्यांपैकी २ लाख ६ ६१९ नमुने पॉझिटिव्ह (१८.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४ हजार ४६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ६२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२७ टक्के एवढा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button