नोटांवरही सॅनिटायझर मारू लागल्याने नोटा खराब होण्याच्या तक्रारीही वाढल्या

सद्या काेराेनाच्या काळात नागरिक सुरक्षा म्हणून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात करत असून नोटांवरही सॅनिटायझर मारू लागले आहेत. मात्र असे केल्याने नोटा खराब होण्याच्या तक्रारीही वाढल्या असून नोटांना सॅनिटायझर लावू नका, असा स्पष्ट सल्ला बँक क्षेत्रातील जाणकार देत आहेत.
नोटांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होतो हे अद्याप स्पष्ट झाले नसून आरबीआयनेही याबाबत कोणत्या सूचना दिलेल्या नाहीत.दरम्यान बँकामध्ये नोटांची देवाणघेवाण अधिक होते. मात्र आम्ही नोटांना सॅनिटायझर न लावता हाताला सॅनिटायझर लावतो व हॅन्डग्लोजचा वापर करतो अशी माहिती बँक कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून ग्राहकांसह दुकानदार , व्यापारी नोटांवर वाटेल तितका सॅनिटायझर मारू लागले आहेत. त्यामुळे अनेक नोटांचा रंग काहीसा उडाला असून नोटा खराब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे बँकातून सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button