गोवा दारू वाहतूक करणारा आयशर ट्रक व सुमारे ३ लाख २४ हजार रुपयांची दारू जप्त
गोवा ते आंबोली मार्गे पुणे अशी विनापरवना गोवा दारू वाहतूक करणारा आयशर ट्रक व सुमारे ३ लाख २४ हजार रुपयांची दारू असा मुद्देमाल आंबोली दूरक्षेत्राच्या पोलिसांनी येथील चेकपोस्टवर जप्त केला. शनिवारी रात्री. ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ट्रकचालक गोपाळ सुरेश गावडे (32, रा. नेनेवाडी, चौकुळ, ता. सावंतवाडी) यालाही ताब्यात घेतले.
आयशर ट्रक गोवा ते पुणे अशी मालवाहतूक करत होता
www.konkantoday.com