
खेकडे आणण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृतदेह नदी किनारी आढळून आला
राजापूर तालुक्यातील कोतापूर सुतारवाडी येथे राहणारा दिलीप सुतार या इसमाचा मृतदेह भालावली नदी किनारी आढळून आला
दिलीप हा शेतात जातो व येताना खेकडे घेऊन येतो असे आपल्या पत्नीला सांगून सायंकाळी घरातून बाहेर पडला होता मात्र तो रात्री घरी परतला नाही म्हणून त्याची शोधाशोध सुरू होती त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अकरा वाजता नदी किनारी आढळून आला याप्रकरणी आकस्मित मृत्यू म्हणून नाटे पोलिसांनी नोंद केली आहे
www.konkantoday.com