काेराेना याेध्याचा काेराेनाने घेतला बळी,जिल्ह्यात काेराेनामुळे मृत्यूंची संख्या २८वर गेली
रत्नागिरी जिल्ह्यात काल काेराेनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे यामध्ये एका कोरोना योध्याचा समावेश आहे.आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यकांचे काल दुपारी निधन झाले.त्याआधी दापोली दाभोळ येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला होता त्यामुळे आता कोरोनाने जिल्ह्यात अट्ठावीस लोकांचे बळी घेतले आहेत.तर दुसरीकडे काल आलेल्या अहवालात जिल्हा रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.त्यामध्ये एका नर्स सह, ब्रदर्सचा समावेश आहे.आता रुग्णालयातील कर्मचार्यांनाच कोरोना ची लागण हाेत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. हे कर्मचारी रत्नागिरी शहराच्या विविध भागातील आहेत त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे
www.konkantoday.com