एटिकेटीच्याच्या विध्यार्थ्यानी सुद्धा विश्वास ठेवा लवकरच मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेऊ की त्याच अनुकरण देखील इतर राज्य करतील.’-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
कोरोना महामारीच्या तडाख्यात सापडल्याने सर्व प्रकारच्या परीक्षा महाराष्ट्रात देखील तत्काळ पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ८ मे रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्ष सोडून सर्व वर्षांच्या परीक्षा या रद्द करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर ३० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर एटिकेटी व बॅकलॉग परीक्षांचे काय होणार यावरून संभ्रम अजून देखील कायम आहे.
यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असून ट्विटर द्वारे आशिष शेलार यांनी सातत्याने एटिकेटीच्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडली आहे. यावर आता पुन्हा एकदा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मौन सोडले असून ट्विटरवरून संदेश दिला आहे. यात मंत्री उदय सामंत म्हणतात, ‘ महाराष्ट्र सरकारने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच राजस्थान, ओरीसा व पश्चिम बंगाल सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एटिकेटीच्या च्या विध्यार्थ्यानी सुद्धा विश्वास ठेवा लवकरच मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेऊ की त्याच अनुकरण देखील इतर राज्य करतील.’
www.konkantoday.com