” एक गांव भुताचा ” ही सिरियल निरोप घेण्याच्या तयारीत?
” एक गांव भुताचा ” ही सिरियल निरोप घेण्याच्या तयारीत असल्याच कळत आहे आणि तस असेल तर ते रत्नागिरी च्या कलाकारांसाठी दूर्दैव ठरेल अस वाटत आहे.याबाबत निश्चिती नाही. कोरोनाच्या या आपत्कालीन परिस्थिततीत महाराष्ट्रात लाॅकडाऊन जाहिर झाले होते जवळ जवळ आज तीन महीने झाले त्यामुळे टिव्ही वरील मालिकांचे शुटिंग सर्व ठिकाणी रद्द झाले होते.याच दरम्याने आमचा मित्र स्टार कलाकार श्री वैभव मांगले आपल्या देवरूख मधील घरी आला होता मिळालेल्या माहितीनूसार मुंबई मधील कोरोनाची परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अनिश्चितता दिसून येत असलेने झी टीव्ही ने वैभव मांगले यांच्या बरोबर चर्चा करून लाॅकडाऊनच्या काळात कोकणात एखादी सिरियल शूटिंग करण्याची योजना आखली आणि वैभव मांगले कामाला लागले आणि थेट रत्नागिरी गाठली आपले मित्र प्रफुल्ल घाग समीर ईंदुलकर आप्पा रणभीसे यांच्या समवेत चर्चा झाली आमच्या गावात नकळत लोकेशन बघण्यासाठी फेरफटका झाला आणि त्याला अनूसरून कथा लिहिण्याची जबाबदारी श्री राजू घाग यांच्या वर टाकण्यात आली तशी राजूकडे कथा तयार होतीच कारण राजु झीटिव्ही वरील रात्रीस खेळ चाले या सिरियलची कथा लिहितच होता त्यामुळे त्याच्याकडे संभाव्य कथा असलेने वैभव आणि टीमने त्याबाबतची तयारी करायला सुरूवात केली शासकीय परवानगीच काम श्री उदय सामंतसाहेबांनी केले कॅमेरा,लाईट, डायरेक्टर,एडिटर, नवोदित कलाकार असा संच तयार झाला आणि वैभव मांगले प्रफुल्ल घाग समीर ईंदुलकर आप्पा रणभीसे आणि सुनील बेंडखळे हे माझ्या घरी आले मलाही आनंद झाला हे मी यापूर्वी लिहिलेच.अगदी प्रतिकुल परिस्थितीत मी आमच्या गावातील लोकांनबरोबर बोलून रहाती घर शुटिंग साठी घेतली कोरोना पाऊस अशा परिस्थिती असतानाही सर्वांनी आपलेपणाने शुटींगला सहकार्य केले आणि बघता बघता बारा भागांचे शुटिंग दाखवल गेले कोकणातील कलाकारांनी मिळालेली संधी असलेने कोंकण आणि महाराष्ट्र आतुर होता आणि त्याप्रमाणे सिरियल लोकांना आवडायला लागली होती आणि तेवढ्यात दुर्दैवाने जिल्हा प्रशासनाने एक तारीख ते आठ तारीख असा लाॅकडाऊन जाहिर केला आणि शुटिंग थांबले आणि त्याचवेळी मुंबई मधे शुटिंग ला परवानगी दिली हे समजले. म्हणजे आमची सिरीयल अर्धवट रहाणार अशी शंकेची पाल चुकचुकली खरतर या सिरियल साठी झीटीव्हीने सव्वीस भागाची परवानगी दिली असल्याचे समजले पण हे आठ दीवस फुकट गेल्यामुळे आता काय होणार अशी संभ्रमावस्था कलाकारांमधे आणी माझ्या सारख्या अनेक नाचणे गावातील लोकांनमधे निर्माण झाली आहे.झीटिव्हीच्या श्री मयेकर यांना आमची विनंती आहे कि कोरोनाच्या या प्रतिकुल परिस्थीती असताना आमच्या नाचणे गावातील लोकांनी जे सहकार्य केले आहे त्यांचा हिरमोड करू नका ठरल्याप्रमाणे सिरियल पूर्ण करावी आणि दाखवावी आणि आता शूटिंग होत असलैली मालिका त्यानंतर दाखवावी ही आमच्या नाचणे गावातील ग्रामस्थांच्या ,कलाकारांच्या वतीने नम्र विनंती आहे.
संतोष सावंत,नाचणे
8275455315