
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 750,24 तासात 40 नवे रुग्ण,बरे झालेल्यांची संख्या 494
काल सायंकाळपासून 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 750 झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 494 झाली असून आज जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून 1 रुग्णाला तर कोव्हीड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून 9 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. बरे होणाऱ्यांचं प्रमाण 65 % आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 10
उपजिल्हा रुग्णालय,कामथे – 14
उपजिल्हा रुग्णालय कळंबणी -16
सध्या एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 228 आहे. मौजे नाचणे, गोडावुन स्टॉप, रत्नागिरी, संमित्रनगर, रत्नागिरी, मौजे नाचणे, समर्थनगर, रत्नागिरी, सीईओ बंगला, रत्नागिरी, मौजे निवखोल, रत्नागिरी, मच्छीमार्केट परिसर, रत्नागिरी, मौजे कुर्धे हे सात क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com