रुग्णालयातील आरोग्य सुविधा देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती
राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटिव्ही बसवावा. उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बोलता येईल यासाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
www.konkantoday.com