रत्नागिरी द.मधून दोन सदस्य भा ज पा. प्रदेश कार्यकारिणी वर नियुक्त होणार :- जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन

भा.ज.पा. प्रदेश कार्यकारिणी वर द. रत्नागिरी मधून दोन सदस्य नियुक्त होतील. आज सकाळी या संदर्भात प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील साहेब यांचे जवळ विस्तृत बोलणे झाले त्यावेळी चंद्रकांत दादा यांनी प्रदेश कार्यकारिणीत 2 नावे रत्नागिरी द.ची असतील लवकरच आपण ती घोषित करू असे त्यांनी आपल्याला सांगितले. भाजपा जिल्हा कार्यकारिणी गठीत करणे संदर्भात ही मार्गदर्शन आज चंद्रकांत दादा यांनी केले. तसेच भा ज पा. जिल्हा कार्यालयाचे नूतनिकरण पूर्ण झाले याबद्दल ही दादांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. कार्यालयाचे उदघाटन दादा स्वतः डिजिटल पद्धतीने करणार आहेत . आज त्यांनी या उदघाटन डिजिटल पद्धतीने करण्यास मान्यता दिली. लॉक डाउन उठल्यावर आ.प्रसाद लाड साहेब प्रदेश उपाध्यक्ष तसेच आ.रवींद्र चव्हाण साहेब भाजपा प्रदेश सरचिटणीस यांच्या प्रत्यक्ष उपस्थीतीत प्रदेशाध्यक्ष लवकरच डिजिटल माध्यमातून नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचा शुभारंभ करतील. अशी माहिती जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.
रत्नागिरीचे दोन प्रतिनिधी प्रदेश कार्यकरिणीवर असतील या बाबत कोणीही संदेह ठेऊ नये. असे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button