
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 14 कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह,एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात 14 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 710 झाली आहे.
जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 207 रुग्ण दाखल आहेत.
काल सायंकाळपासून पॉझिटिव्ह रुग्णांना पुढीलप्रमाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालय – 6 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय, कामथे -6 रुग्ण
उपजिल्हा रुग्णालय कळबणी – 2 रुग्ण
आज दाभोळ, ता. दापोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांचे वय 60 वर्षे होते. रुग्णाला मधुमेह, ब्लड प्रेशर तसेच एकदा हृदय विकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅब चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 27 झाली आहे.
www.konkantoday.com