
लग्नाचे आमिष दाखवत महिला डॉक्टरवर अत्याचार करणार्या सहकारी डॉक्टरवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवत महिला डॉक्टरवर अत्याचार करणार्या सहकारी डॉक्टरवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची आई आणि बहिणीने पिडीतेला शिवीगाळ केल्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ.महेश वसंत खबरे(29),त्याची आई सुप्रिया वसंत खबरे (51,दोन्ही मुळ रा.बेळगाव) आणि त्याची बहिण प्रियंका संदीप चौथे (31,रा.नांदेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्यात आणि महेश खबरे या दोघांमध्ये मैत्रिचे संबंध होते.यातूनच महेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मार्च 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत अत्याचार केले.
दरम्यान पिडीतेने महेशला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देउन लग्नास नकार दिली.तसेच महेश खबरेची आई आणि बहिणीने पिडीतेला शिवीगाळ केली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com