
ऑनलाइन साइटवरील मोटरसायकल विकत घेण्याच्या नादात १ लाख २१ हजारांचा गंडा बसला
खेड खाेपी येथील ईप्ते वाडी येथे राहणारा भूषण आग्रे या तरुणाला ऑनलाइन मोटारसायकल विकायची आहे असे आमिष दाखवून त्याची १लाख २१ हजार रुपयांची फसवणूक होण्याचा प्रकार घडला आहे.फिर्यादी भूषण हा आपल्या मोबाइलवर सर्च करीत असताना त्याला क्विकर या ऑनलाइन साइटवर ब्लॅक रंगाची स्प्लेंडर बाइक विक्री करावयाची जाहिरात दिसली त्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यावर त्याने ही बाइक विकायचे आहे असे सांगून आपल्या एका साथीदाराचे नाव नाव सांगितले यामुळे फिर्यादी यांचा त्यांच्यावर विश्वास बसला फिर्यादी याने आपल्या मित्राच्या गुगल पे वरून व भावाचा गुगल पे वरून आरोपी धर्मेंद्र शर्मा राहणार नाशिक याच्या अकाऊंटवर १लाख २१हजार रुपये भरले मात्र आरोपी धर्मेंद्र शर्मा त्याच्या साथीदार यांनी कोणतीही बाइक पाठवली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी याने खेड पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार केली आहे
www.konkantoday.com