आत्मनिर्भर च्या नावाखाली ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांची भाजपवर जोरदार टीका

कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडीआरएफचे निकष बदलून मोठय़ा प्रमाणावर मदत केली.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांना कोरोना टेस्टिंग लॅब दिल्या ही चांगली कामे त्यांना दिसत नाहीत.आत्मनिर्भर च्या नावाखाली ठाकरे सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप करीत असल्याचा गंभीर आरोप रत्नागिरी जिल्हय़ाचे पालकमंत्री अनिल परब व सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.आजच्या पत्रकार परिषदेत दोन्ही मंत्री महोदयांनी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला.यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले आत्मनिर्भर चा अर्थ स्वावलंबी व्हायचे असा आहे.परंतु हे केवळ विरोधकांवर आरोप करत बसले आहेत.सत्तारूढ पक्षाला बदनाम करणे हेच काम भाजप करत आहे.लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे लोक करीत आहेत.विरोधकांच्या अशा टीकेमुळे आम्ही विचलित होणार नाही कारण केबिनमध्ये बसून मी काम करत नाहीत तर रस्त्यावर उतरून लोकांची काम करतो हे विरोधी पक्षाचे नेते केवळ दौरे करून पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्याचे काम करीत आहेत.आम्ही ताठ मानेने काम करत असल्यामुळे आम्हाला त्यांना घाबरण्याचे कारण नाही.त्यामुळे त्यांच्या आरोपांना किंमत देण्याची गरज नसल्याचे परब यांनी सांगितले.यावेळी सिंधुदुर्गचा पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील भाजपवर जोरदार टिका केली मुख्यमंत्री व महाविकास आघाडीने केलेल्या चांगल्या कामाकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे याकरिता विरोधकांचा प्रयत्न आहे व त्यासाठी जनतेत गैरसमज पसरवण्याचे कामे ही मंडळी करीत आहेत.आम्ही कोकणवासियांचे भले करित आहोत त्यामुळे आम्हाला दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज नाही.रत्नागिरी जिल्हय़ाच्या दौऱयावर आलेले विरोधी पक्षनेते दरेकर यांना शिवसेनेवर टीका करण्याचे आदेश असावेत म्हणून ते येथे येऊन आरोप करीत आहेत.माझ्यात व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या भांडणे लावायचे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु हा त्यांचा प्रयत्न म्हणजे बालिशपणाचा प्रकार आहे. त्यामुळे त्याना वाटते तसे काहिही हाेणार नाही आम्ही एकत्र येऊन त्याला चाेख उत्तर देखील देऊ.असेही सांमत यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button