पावसाचा जोर आज रविवारीही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला

0
268

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून जोर धरताना शनिवारी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सर्वच तालुक्यांत पावसाने जोर धरला होता. गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपातळीने पूररेषेची मजल गाठल्याने प्रशासनाने सावधगिरी बाळगली आहे.
हवामान विभागाचा जोरदार पावसाचा अंदाज खरा ठरताना शनिवारी पावसाला जोरदार वार्‍यांचीही साथ होती. पावसाचा जोर गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच आज रविवारीही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून लॉकडाऊन असताना आता संभाव्य आपत्तीत सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here