लोटे औद्योगिक वसाहतीत कठोर उपाययोजना कराव्यात -आ. भास्करशेठ जाधव

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोटे औद्योगिक वसाहतीतील सर्वात मोठी औद्योगिक कंपनी घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये सकृतदर्शनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट व चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण २१ एप्रिल रोजी उपाययोजनांबाबत दिलेल्या पत्रात विचार होवून या पत्रातील सुचविलेल्या उपाययोजना व त्याहून कठोर उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी माजी मंत्री, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button