
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता
पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रात असलेली चक्राकार वार्यांची स्थिती यामुळे मोसमी पावसाला जोर धरण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणात ४ आणि ५जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी)े वर्तविला आहे. आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार ठाणे, पालघर तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. शनिवारी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुढील तीन-चार दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com