
रत्नागिरीत मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत मेडिकल स्टोअर्स सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच उघडी राहणार आहेत.
मेडिकल स्टोअर्सचे मालक, दुकानातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असो. ने सदरचा निर्णय एका पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. असो. चे अध्यक्ष उमेश शिंदे, सचिव महेश घोसाळकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच मेडिकल स्टोअर्स उघडी राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
konkantoday.com