एलटीटी-मंगळूर स्पेशल २० पासून धावणार


नवरात्रौत्सवासह दीपावली सणात कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित रेल्वेगाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे व दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार एलटीटी-मंगळूर स्पेशल २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत धावणार आहे.
०११८५/०११८६ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी धावेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वा. सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मंगळूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दर शनिवारी धावणारी स्पेशल मंगळूर स्थानकातून सायं. ६.४५ वा. सुटून दुसर्‍या दिवशी दु. २.२५ वा. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. २१ डब्यांची स्पेशल कोकण मार्गावर ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव आदी स्थानकात थांबेल. या स्पेशलमुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button