चिपळुणात पावसाची संततधार ,सतर्कतेचा ईशारा
चिपळुण शहरात आणि ग्रामीण भागात काल रात्रीपासून पाऊस संततधारपणे कोसळत आहे. पावसाला जोर असल्याने वाशिष्ठी, शिव नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. बाजारपुलाला पाणी टेकायला आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या पौर्णिमा असल्याने पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे काही दिसून येत नाहीत.त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने केली आहे
www.konkantoday.com