गणेशोत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही जिल्ह्यात समिती स्थापन करणार- ना.उदय सामंत
सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात येणाऱ्या गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक व घरगुती गणपती उत्सव कशा रीतीने काळजी घेऊन साजरे करावे यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन करण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १६ सदस्यांची तर रत्नागिरी जिल्ह्यात १७ सदस्यांचा समावेश कमिटीमध्ये असणार आहे.या कमिटीमध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व घरगुती गणेश उत्सव मंडळाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.ही कमिटी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन गणेशोत्सव कसा साजरा करायचा याबाबत निर्णय घेईल.तसेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यात ३.५ लाख चाकरमानी आले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २.५० लाख चाकरमानी आले आहेत.गणपतीच्या काळात आणखी चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत कशी काळजी घ्यायची याची नियमावली तयार करून या कमिटीने मुख्य सचिवांना पाठवायची आहे.सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करताना लालबागच्या राजा या गणेशोत्सव मंडळाने जो गणेशोत्सव रद्द करून आरोग्य शिबिरे भरविण्याचा निर्णय घेतला आहे.त्याच धर्तीवर आपल्या रत्नागिरीतील श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी देखील हा उत्सव रद्द करून त्यानिमित्ताने जमा होणारा निधी काेराेना प्रतिबंधक उपाय योजनेकरिता वापरण्यात येणार आहे.प्लाझ्मा थेरपीसाठी आवश्यक असणारे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे रक्त गोळा करण्याचा उपक्रमही राबवण्याचे त्याने स्पष्ट केले.तसेच मुंबई गोवा महामार्ग संदर्भात येत्या दोन तीन दिवसांत खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.या बैठकीत गणेशोत्सव काळात महामार्गावरील टोल रद्द करावा तसेच गणेशोत्सवासाठी ई पासेस मिळावे या प्रश्नांबाबत प्रमुखाने निर्णय घेतला जाईल.
www.konkantoday.com