कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, कोकणात अजूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना मदत मिळालेली नाही. तर ज्यांना मदत मिळाली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे.
तरीही कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो म्हणतो मदत नको पण केवळ कचरा साफ करून द्या. पण ही मुलभूत कामंही करण्यास प्रशासन तयार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली.
www.konkantoday.com