
किनारा सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा,प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला सुचना दिल्या
मिऱ्या येथे अडकलेले बसरा स्टार जहाज किनाऱ्यावर रुतले आहे. त्यामुळे बंधाऱ्यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जहाजामधील धोकादायक असलेले ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले आहे.
मात्र किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा, स्क्रॅप करा, पण काहीतरी निर्णय घ्या, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे. या जहाजाच्या मुक्कामाला
महिना झाला आहे
www.konkantoday.com