आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आला
मुंबईमध्ये काल कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यातच आज ११.४० वाजता ४.५७ मीटर एवढी हायटाईड देखील आहे. यामुळे १५ फुटापर्यंत लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. याच वेळी जर जोरदार पाऊस झाला तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com