शिवसेना आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली

शिवसेना आमदार योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बागायतीच्या प्रत्येक झाडामागे मदत मिळावी, अशी मागणी कदम यांनी केली.
योगेश कदम हे शिवसेनेकडून खेड दापोली मतदारसंघाचे आमदार आहे ‘निसर्ग’ चक्रीवादळाला आज एक महिना पूर्ण झाला. याच पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, फळबागा, कृषीविषयक उद्योग, पर्यटन उद्योग व इतर महत्वपूर्ण विषयांसाठी ही भेट झाल्याचं कदम यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button