व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Zoom ला भारतीय पर्याय JioMeet लाँच

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Zoom ला भारतीय पर्याय आला आहे. रिलायन्स जिओने गुरूवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी एक नवीन अ‍ॅप JioMeet लाँच केलं आहे.
JioMeet हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध झालं असून याच्या वापरासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, हे अ‍ॅप पूर्णतः मोफत असणार आहे. या अ‍ॅपची वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे १०० पेक्षा जास्त जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येतील. JioMeet अ‍ॅप जवळपास सर्व प्रकारच्या फोनला सपोर्ट करतं.
जिओमीट अ‍ॅपमध्ये मिटिंग शेड्यूल करण्यापासून, स्क्रीन शेअर करण्यासारखे अनेक फीचर्स आहेत. या अ‍ॅपमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कोड किंवा इन्व्हाइटची गरज लागत नाहीडेस्कटॉपवरुन काम करणारे युजर्स गुगल क्रोम आणि मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवरुनही JioMeet चा वापर करु शकतात.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button