
लॉकडाऊनच्या जीआरमध्ये असंख्य चुका – माजी आमदार डॉ. विनय नातू
जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या जीआरमध्ये असंख्य चुका आहेत. त्यामुळे हा आदेश बाह्यशक्तींनी काढला नाही ना अशी शंका येते. हा निर्णय घेताना जिल्ह्यातील सर्व आमदारांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातूंनी उपस्थित केला आहे.
डॉ. नातू म्हणाले की, एका बाजूला देश अनलॉककडे जाताना रत्नागिरी जिल्हा परत लॉकडाऊनकडे जात आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केलेली नाही. जीआरवरून लॉकडाऊनचा निर्णय पर्यावरणमंत्री परिवहनमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून झाल्याचे समजते. आदेशात मुख्य सचिवांच्या पदनामाचा उल्लेख आहे. व्यक्तीचे नाव नाही. मराठीचा आग्रह धरणार्या सरकारच्या आदेशात शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. अशा पद्धतीचा आदेश प्रथमच पहात आहे, असे डॉ. नातू म्हणाले.
konkantoday.com