राज्यात काल ६ हजार ३३० रुग्ण सापडले तर ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले
राज्यात काल आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात एकूण ६ हजार ३३० रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. दुसरीकडे काल ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १,०१,१७२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.२१ % एवढे झाले आहे.
राज्यात काल १२५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ११० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५ मृत्यू मागील कालावधीतील आहेत.
www.konkantoday.com