रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार- ना.उदय सामंत
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, डॉक्टर तात्यासाहेब लहाणे व दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहभागी झाले होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला केंद्राच्या बृहत आराखड्यात मंजुरी असल्याने सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे मेडिकल कॉलेजच्या कामाला येत्या दोन तीन महिन्यांत मंजुरी मिळेल अशी माहिती नामदार उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसाठी प्राधिकरणाची २५ एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्त करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात वेग येईल.मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसाठी केंद्राच्या बृहत आराखड्यात मंजुरी नसल्याने रत्नागिरीत मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत खास बाब म्हणून मंजुरी द्यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आले आहे.तसेच रत्नागिरी शहराजवळ पंचवीस एकर जागा या कॉलेजसाठी लागणार असून तसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय सचिवांकडे पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या कॉलेजला मंजुरी मिळाल्यास सुरुवातीला जिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालय येथे कॉलेज सुरू करण्यात येणार आहे.तसेच रत्नागिरीतही जिल्हा रुग्णालय मेंटल हॉस्पिटल व महिला रुग्णालय कॅम्पसचा विचार देखील मेडिकल कॉलेजसाठी करण्यात येणार आहे.हे दोन्ही कॉलेजचे प्रस्ताव येत्या महिनाभरात कॅबिनेट समोर मंजुरीसाठी जाणार आहेत.
www.konkantoday.com