रत्नागिरी कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये तीन दिवस पुरेल इतका कीटचा साठा उपलब्ध-ना.उदय सामंत
रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये कीटच्या तुटवड्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.मात्र रत्नागिरीतील कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये तीन दिवस पुरतील इतकी कीट असल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.ही कीट पुरवणाऱया व्हेंडरच्या पैशांबाबत निर्णय झाला असून त्यासाठी ६६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.तसेच सदरच्या वेंडरशी माझे देखील बोलणे झाले असून आता त्याबाबतचा संभ्रम दूर झाला असून किट आणण्यासाठी पुण्याला गाडी रवाना झाले आहे त्यामुळे रत्नागिरीतील कराेना टेस्टिंग लॅबमध्ये कीट उपलब्ध राहणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.रत्नागिरीचे सिव्हिल सर्जन अशोक बोल्डे यांना रजेवर पाठवण्याबाबत व त्यांच्यावर कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता हा विषय आपल्या अत्यारीत येत नसून याबाबत माहिती घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com