
थाळी वाजूवून, दिवे लावून कोरोना गेला नाही,आता लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन ब्रेक होईल अशी आशा आहे- ना.उदय सामंत
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात करून रुग्णांची संख्या वाढल्याने या दोन्ही जिल्ह्यात लाॅक डाऊन करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्री ठरवत नाही तर हा निर्णय घेताना जिल्हाधिकाऱयांनी मुख्य सचिवांची चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाउन कडकपणे पाळला जात असून ब्रेक दी चेन या मिशनमुळे कोरोना कमी होईल का असे आपणाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंत यांना विचारला त्यावेळी बोलताना ते म्हणाले थाळी वाजवुन व दिवे लावुन कोरोना गेला नाही.लॉकडाऊन करून कोरोनाची साखळी तुटावी हा आमचा हेतू आहे.सध्या मोठय़ा प्रमाणात कराेना बाधित रुग्णांची वाढती संख्या दिसत आहे या रुग्णांची संख्या येत्या दोन तीन दिवसात या अवलंबिलेल्या उपाययोजनांमुळे कमी होईल अशी आपणाला आशा आहे असे सांमत ह्यानी यावेळी बाेलताना सांगितले.
www.konkantoday.com